Mumbai High Court: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील स्वप्ना पाटकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर विविध आरोप करत दाखल केलेली एका 39 वर्षीय महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ) फेटाळून लावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना एक प्रकारे क्लिन चिट मिळाल्याचे मानले जात आहे. स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) असे या महिलेचे नाव असून त्या उच्चशिक्षित आहेत. या महिलेने संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपात म्हटले होते की, राऊत हे त्यांचा छळ करतात. त्यासाठी ते इतर लोकांचा वापर करतात. पाठीमागे माणसे लावतात. हेरगिरी करतात. जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करतात.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करत या महिलेने म्हटले की, संजय राऊत यांच्या सांगण्यावरुन पाठीमागील सात वर्षांपासून आपला छळ सुरु आहे. न्यायालयाने या महिलेची याचिका फेटाळून लावली आहे. (हेही वाचा, Maharashtra: राज्यपालांनी राजकारणातील प्यादे होऊ नये; विधान परिषदेच्या जागांवरून संजय राऊत यांचा टोला)

संजय राऊत हे आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच शिवसेनेचे ते महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती.