देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनाग्रस्तांची आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु वैद्यकिय कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर्स यांच्याकडून कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारच्या सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील कामाबाबत टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईत एका दिवसात कोविड19 च्या संदर्भातील चाचणी करण्याची क्षमता जवळजवळ 14 हजार आहे. मात्र तरीही दिवसाला फक्च 4 हजार नमुन्यांचे परिक्षण केले जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
त्याचसोबत एकूण महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात एकूण 38 हजार कोरोनाच्या संदर्भातील चाचणी करण्याची क्षमता आहे. परंतु तरीही दिवसाला फक्त 4 हजार नमून्यांची चाचणी केली जाते. त्याचसोबत सरकारकडून कोरोनाबाधितांचा आकडा कमी व्हावा यासाठीच चाचण्या सुद्धा कमी करत असल्याचे ही खोचक टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.(मुंबईतील धारावीत आज नव्याने 17 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2 हजारांच्या पार, मुंबई महापालिकेची माहिती)
Maharashtra has capacity to test 38000 samples per day for #COVID19 but only 14000 tests are conducted. Mumbai has capacity to test 12000 samples per day but only 4000 tests happen. Govt is trying to keep number of cases low by testing less number of samples:Devendra Fadnavis,BJP pic.twitter.com/Hh3nx04bLh
— ANI (@ANI) June 13, 2020
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता 104568 वर पोहचला आहे. तर आज नव्याने 3427 कोरोनबाधित रुग्ण आढळून आले असून 113 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा ही 3830 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.