
Mumbai: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुधवारी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथे परवानगी शिवाय गॅस सिलिंडर भरणाऱ्यांच्या विरोधात ही कार्यवाही करण्यात आली आहे. पोलिसांनी असे म्हटले की, या गोष्टीमुळे स्फोट होण्याचा धोका असल्याचे माहिती असून ही आरोपी हे काम परवानगी शिवाय करत होते.(Pimpri- Chinchwad: रस्त्याने जाणाऱ्या तरूणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, फूड डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल)
अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा शाखेच्या युनिट 6 ने शिवाजी नगर येथील वर्कशॉप वर छापा टाकला. तेव्हा पोलिसांना तेथे पाच जण हे रेग्युलेटर बदलण्यासह मोठ्या गॅस मधून लहान गॅसमध्ये फिलिंग करत होते. यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी सुद्धा घेतली नव्हती.(Mumbai: टूथपेस्ट समजून उंदीर मारणाऱ्या औषधाने घासले दात, मुलीचा मृत्यू)
पोलिसांनी 14 भारत गॅस सिलिंडर,105 लहान भरलेले सिलिंडर आणि 541 रिकामे सिलिंडर त्यांना घटनास्थळी मिळाले. ज्या गोष्टी ते हाताळत होते ते अत्यंत ज्वलनशील होते. मात्र जरा जरी लहान अपघात झाला असता तर तेथे राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण झाला असता.