Mumbai Fire: कुर्ला-पश्चिम येथील मेहता इमारतीला भीषण आग; अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई (Mumbai) येथील कुर्ला पश्चिम (Kurla West) परिसरातील मेहता इमारतीला ( Mehtab building) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले असून या आगीत 8 पेक्षा अधिक गॅस सिलिंडरचा स्फोट धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीनुसार ही इमारत तब्बल 80 वर्ष जुनी आहे. आग कशामुळे याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मुंबईच्या कुर्ला परिसरातील निवासी इमारतीत शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली. माहितीनुसार, आग कुर्लाच्या आंबेडकर नगरातील बुद्ध कॉलनी येथील एसजी बर्वे मार्गावर असलेल्या मेहता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दुसर्‍या मजल्यापासून सुरू झाली. मेहता इमारत ही 80 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास पोलीसांना या आगीची माहिती मिळाली. घटनास्थळी मुंबई पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पाण्याचे टॅंकर दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- बदलापूर एमआयडीसी मधील केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने लागली भीषण आग; एक जण ठार तर दोन गंभीर जखमी

ट्विट-

वरील व्हिडिओमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू येत आहे. आग कशामुळे लागली अद्याप याचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, सिलिंडरचा स्फोट हा आगीला कारणीभूत ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केले जात आहे.