बदलापूर एमआयडीसी मधील केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने लागली भीषण आग; एक जण ठार तर दोन गंभीर जखमी
Representational Image (Photo Credits: IANS|Representational Image)

Fire Broke Out At A Chemical Company In Badlapur:  बदलापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्यामुळे, त्यात 1 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. कंपनीतील कामगारांना या आगीचा जास्त फटका बसला असल्याचे समजले आहे. बदलापूरमध्ये असलेल्या के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत ड्रायरचा स्फोट झाला आणि त्या स्फोटानंतर आजूबाजूच्या भागात आग पसरली. ही आग इतकी भीषण होती की कंपनीतील बरेच सामान त्यात जळाले आहे.

या केमिकल कंपनीत आज सकाळी (22 जानेवारी) सुमारे नऊ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेला असल्याचे समजले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती जवळपासच्या लोकांनी लगेचच अग्निशमन दलाला दिल्याने, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी ताबडतोब हजार झाल्या आहेत.

गंभीररित्या जखम झालेल्या 2 कामगारांना लगेचच जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यात आले आहेत.

बोईसर: तारापूर एमआयडीसी येथील कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी, बोईसरमधील (Boisar) तारापुर एमआयडीसी येथील तारा नाइट्रेट एम -3 नामक केमिकल कंपनीमध्ये संध्याकाळच्या वेळी, सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्या दुर्घटनेत 8 कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता तर अनेकजण जखमी झाले होते.