Fire in Chembur | (Photo courtesy: ANI)

मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) येथे रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सुनीता जोशी (वय-७२), भालचंद्र जोशी (वय ७२), सुमन श्रीनावास जोशी (वय ८३ ) या तिघांचा घटनास्थळी तर श्रीरीनिवास जोशी (वय ८६) यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचव्या मृत व्यक्तीचे नव समजू शकले नाही. आग लागलेल्या सोसाटीचे नाव सरगम असे असून ती टीळकनगर (Tilak Nagar) स्थानकाजवळून नजीकच्या अंतरावर आहे. सरगम सोसाटीच्या 14 व्या मजल्यावर आग भडकली. आग नियंत्रणात आमण्यासाठी अग्निशमन दालाचे जवान शर्थिचे प्रयत्न करत होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. यात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला.

आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि 5 टॅंकर घटनास्थळी पोहोचले. आगिचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्रथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, इमारतीत ज्या घराला आग लागली त्यात कोणीच राहात नसावे असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या इमारतीची अग्निरोधक यंत्रणा काम करत नव्हती. तसेच, रस्त्यावर आणि परिसरात बेकायदेशीर तसेच बेशिस्थपणे वाहने उभी केल्यामुळे अग्निशमन दलास घटनास्थळी पोहोचायला वेळ लागल्याचा आरोप स्थानिक नगरसेकांनी केला आहे. (हेही वाचा, नवी मुंबईतील जुई नगर रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या डब्यांना आग)

दरम्यान, गेल्या काही काळात मुंबईत आगीच्या घटनांची संख्या वाढत आहे. प्रत्येक आठवड्यात किंवा एक दिवस आड कुठे ना कुठे आग लागल्याची घटना घडतच आहे. कांदिवली येथील कापड गोदालामाल लागलेल्या आगीला अजून एक आठवडाही होत नाही तोपर्यंत चेंबूर येथील आग लागल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या आगीच्या घटनांकडे लक्ष वेधता कांदिवली येथे-4, अधेंरी येथील कामगार रुग्णालयात-11 जणांना आपला जीव गामवावा लागला होता.