मुंबई (Mumbai) शहरातील लोअर परळ (Lower Parel) येथील मॅरेथॉन फ्यूचेरेक्स (Marathon Futurex) या इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. ना. म. जोशी (N M Joshi Marg ) मार्गावर असलेल्या या इमारतीचा परीसर नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यना, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. भुषण कदम नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विट करत आगीबाबत माहिती दिली आहे.
मॅरेथॉन फ्युचेरेक्स इमारत मफतलाल मिल कंपाऊंड परिसात असलेली बहुमजली इमारत आहे. या इमारतीत प्रसारमाध्यम समूह, वृत्तवाहिन्यांची कार्यालयं आहेत. तसेच, झी मीडिया समूह आणि इस्त्राईलचे दुतावासही याच इमारतीत आहे. त्यामुळे हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल जातो. याच परिसरात बॉंक ऑफ इंडियाेच कार्यालयही आहे. त्यामुळे ही आग अधिक पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. (हेही वाचा, Palghar Fire: पालघर येथील हिंदुस्थान पेट्रो फोमला लागलेल्या आगीमुळे कंपनीचे सुमारे 15 कोटींचे नुकसान)
ट्विट
Fire seems to be under control and the entire Marathon Futurex building has been evacuated. #Mumbai pic.twitter.com/CZ9VaHsvd4
— Bhushan Kadam (@BhushaanKadam) February 19, 2020
दरम्यान, या आगीत अद्याप कोणतीही जीवित अथवा मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. इमारतीत असलेली कार्यालये आणि इस्त्रायली दुतावास कार्यालय आदी कारणामुळे ही इमारत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय स्वयंपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शस्त्रधारी मुंबई पोलीसांचा इथे सतत पहारा असतो. असे असतानाही इथे आग लागलीच कशी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ही आग आटोक्यात आणल्याचे वृत्त आहे.