मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल Yauatcha मधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; अनिश्चित काळासाठी व्यवसाय बंद
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

मुंबई (Mumbai) मधील प्रसिद्ध Yauatcha हॉटेल मध्ये एका कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID19 Positive) आल्याने आता हॉटेल आणि फूड डिलिव्हरी (Food Delivery) अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या हॉटेल ने स्वतः आपल्या इंस्टाग्राम पेज वरून याबाबत माहिती दिली, या भागात आता सॅनिटायजेशन करण्यास सुरुवात झाली आहे तर कोरोनाबाधित कर्मचाऱ्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्याच्या संपर्कत आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांची तासानी केली असता या कोणालाही कोरोनाचे लक्षण (Coronavirus Symptomps)  दिसून आलेले नाही तरी या कर्मचाऱ्यांना व बाधित रुग्णाच्या कुटुंबाला सुद्धा क्वारंटाईन मध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Coronavirus In Maharashtra: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

Yauatcha हॉटेल तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात टीम केए हॉस्पिटॅलिटीने स्पशीतकारां देत सांगितले की, “सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यापासून ते स्वच्छतेची काळजी घेण्यापर्यंत सर्वकाही केले असतानाही , 16 मे 2020 रोजी आमच्या टीमच्या सदस्याची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. यांनंतर आता अनिश्चित काळासाठी किचन बंद ठेवण्यात येणार आहे, संपूर्ण टीम ही विलगीकरणात असून त्यांच्या सुद्धा चाचण्या केल्या जात आहेत. नागरिकांनी सुद्धा कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास हलगर्जी न करता तपासणी करून घ्यावी."

पहा Yauatcha हॉटेल ची पोस्ट

दरम्यान, रिपोर्टनुसार Yauatcha रेस्टॉरंटमध्ये दर दोन तासांनी टीम सदस्यांची दररोज तापमान तपासणी केली जात होती. कर्मचाऱ्यांसाठी थ्री-प्लाय फेस मास्क, कटिंग बोर्ड चाकू, टेबल आणि दरवाजाच्या Knob पर्यंत प्रत्येक वस्तूची तपासणी केली जात होती. सर्व काही नियमित सॅनिटाईज केले जात असतानाही असा अनपेक्षित प्रसंग ओढवला आहे. Yauatcha तर्फे काही दिवसांपूर्वी यापूर्वी कुलाबा, चेंबूर आणि अंधेरी आणि मुंबईतील काही भागात फूड डिलिव्हरीला सुरुवात करण्यात आली होती. हे मुंबईतील 2010 पासून सुरु आसनराई हे प्रसिद्ध हॉटेल आहे, ज्यात विशेषतः चायनीज खणायसाठी लोकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते.