Covid 19 Vaccine | (Photo Credits: Pexels.com)

महाराष्ट्रामध्ये कोविड 19 शी (Covid 19) लढण्यासाठी आता लसीकरण प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. पण वयोवृद्धांसाठी आणि दिव्यांगासाठी कोविड 19 ची लस घरपोच देण्यात यावी यासाठी मागणी केली जात असताना आता पालिकेने यावर तोडगा काढत आता ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन सेंटर (Drive In Vaccination Center) सुरू केले आहे. मुंबई पहिलं ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन सेंटर दादरच्या कोहिनूर पार्किंग़ लॉट (Kohinoor Public Parking Centre) मध्ये सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ आणि दिव्यांगांना त्यांच्या गाडीतच कोविड 19 लसीचा डोस दिला जाणार आहे. दरम्यान त्यानंतरच्या 30 मिनिटांच्या प्रतिक्षेच्या काळासाठी देखील त्यांना गाडीतच बसून ठेवले जणार आहे.

मुंबई मध्ये जी नॉर्थ विभगामध्ये हे सेंटर आहे. कोहिनूर पार्किंग़ लॉट मध्ये असलेल्या या केंद्रावर दिवसाला 5000 लसी देण्याची क्षमता आहे तर ड्राईव्ह ईन वॅक्सिनेशनच्या माध्यमातून त्यामधील 200 जणांना लसी दिल्या जाणार आहेत. ही सोय 45 वर्षांवरील नागरिकांसाठी असेल. आज (4 मे ) दिवशी या ड्राईव्ह ईन वॅक्सिनेशन सेंटरचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये इतर भागातही अशी ड्राईव्ह ईन सेंटर सुरू करण्यासाठी चाचपणी पालिकेकडून केली जात आहे. ( नक्की वाचा:  Covid 19 Vaccination: पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम च देऊ शकतात कोविड 19 लसीकरणाचा अपेक्षित परिणाम; संशोधकांचा दावा)

मुंबई मध्ये ड्राईव्ह ईन वॅक्सिनेशन

मुंबई मध्ये सध्या केंद्र सरकारकडून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसींचा पुरवठा तर 18 ते 44 वयोगटासाठी राज्य सरकारकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये मागील 3 दिवस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे तर 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण देखील मंद वेगाने सुरू आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांची लांबच लांब रांग पहायला मिळत आहे.