मुंबई: धारावीत आज कोरोनाच्या 25 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1830 वर पोहचला तर 71 जणांचा बळी- BMC
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचे आज नवे 25 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1830 वर पोहचला आहे. धारावीत आतार्यंत कोरोनाचे 71 बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना सारख्या महासंकटाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोरोनाग्रस्तांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत.

राज्यात लॉकडाऊन पुढील काही दिवस कायम राहणार असला तरीही टप्प्याटप्प्याने नियम शिथील करण्यात येणार आहे. परंतु त्यावेळी सुद्धा नियमांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात येत्या काळात कोरोनाची परिस्थिती गंभीर होणार असली तरीही राज्य सरकारकडून त्यासाठी तयारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.(Coronavirus: कोरोनाशी लढा देऊन पुन्हा कामावर रुजू झालेल्या कोविड योद्धाचे कुर्ला पोलिस स्टेशनात 'अशा' पद्धतीने केले स्वागत, Watch Video)

दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे नवे 2 हजार 361 रुग्ण आढळून आले असून 76 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 70,013 वर पोहचला असून 2362 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.