COVID Warriors (Photo Credits: Twitter/Mumbai Police)

कोरोनाने (Coronavirus) संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात घेतले असून यातून आपल्या देशाला बाहेर काढण्यासाठी पोलिस, डॉक्टर, नर्सेस यांच्या रुपात मिळालेले कोविड योद्धा (COVID Warriors) दिवसरात्र कष्ट करत आहेत. लोकांची सेवा करणारे आपल्या जीवाची पर्वा न करता एखाद्या योद्ध्याप्रमाणे ही लढाई लढत आहे. असे करत असताना मात्र अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र यातही जराही न डगमगता अनेकांनी या रोगावरही मात करून पुन्हा देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे. मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यातील (Kurla Police Station) असाच एक कोविड योद्धा कोरोनावर मात करुन पुन्हा कामावर रुजू झाले. त्यावेळी पोलिस स्टेशनातील सर्व कर्मचा-यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन आनंदाने स्वागत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या पोलिस अधिका-यांनी कोरोनावर मात करुन पुन्हा कामावर रुजू झाले. यामुळे ते पोलिस स्टेशनात दाखल होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

सद्य घडीला महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलातील एकूण 2,416 पोलिस कोरोना बाधित आहेत. त्यापैकी 1421 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर 26 पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन काळात पोलिसांवर ताण अधिकच वाढला आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांती देण्यासाठी SRPF च्या जवानांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर यांसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी तैनात करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस खात्यातील अधिकारी किंवा कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना चांगले उपचार, सुविधा मिळतील याकडे पोलिस खात्याचं लक्ष आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.