Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या यादीत काल पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, काल 1 जून रोजी राज्यात नवे 2361 कोरोना रुग्ण आढळून आले तसेच 76 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार सद्य घडीला राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 70,013 वर पोहचली आहे. यापैकी 2362जणांचा आजवर कोरोनाने बळी घेतला आहे तर 30 हजार 108 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईत सुद्धा काल कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येने 40 हजाराचा आकडा पार केला. मुंबईत (Mumbai) काल 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 40 हजार 877 वर पोहचली आहे. मुंबई पाठोपाठ, ठाणे (Thane), पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad), नाशिक (Nashik) याठिकाणी अनुक्रमे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यासहित राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे खाली दिलेल्या सविस्तर तक्त्यातून जाणून घ्या.

महाराष्ट्रात 30 जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात येणार असले तरी कालपासून विविध ठिकाणी अनेक उद्योग व्यवसायांना सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दिवसातही हॉटेल पासून धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. मात्र या सवलती रेड आणि कंटेनमेंट झोन मध्ये देण्यात येणार नाहीत. राज्यात सध्या कंटेनमेंट 3294 झोन आहेत. तुम्ही राहात असणारा जिल्हा रेड, ग्रीन, ऑरेंज पैकी कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 41099 1319 16985
ठाणे 9941 215 3637
पुणे 8045 338 3793
औरंगाबाद 1543 68 1012
नाशिक 1182 67 893
रायगड 1148 41 598
पालघर 1071 33 391
सोलापुर 933 70 423
जळगाव 696 72 298
अकोला 603 28 326
नागपुर 592 11 378
सातारा 527 16 177
कोल्हापुर 509 4 150
रत्नागिरी 264 5 99
अमरावती 232 16 124
हिंगोली 190 0 106
धुळे 145 16 88
यवतमाळ 130 1 99
जालना 129 1 57
लातुर 125 3 60
नांदेड 123 6 91
अहमदनगर 120 6 57
सांगली 112 1 62
उस्मानाबाद 76 1 26
गोंंदिया 66 0 38
परभणी 63 1 3
बुलडाणा 63 3 33
बीड 47 1 26
गडचिरोली 36 0 10
नंदुरबार 35 3 27
सिंधुदुर्ग 33 0 8
भंडारा 32 0 9
चंद्रपुर 26 0 17
वर्धा 9 1 1
वाशिम 8 0 6
अन्य जिल्हे 60 15 0
एकुण 70013 2362 30108

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार, राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून 43.35 टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) 11 वरून 17.5 दिवसांवर गेला आहे.