मुंबई: धारावीत आज कोरोनाच्या दोन रुग्णांची भर तर 2 जणांचा बळी, COVID19 चा आकडा 2311 वर पोहचला
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. याच दरम्यान राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह अन्य जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. तर आता मुंबईतील धारावीत कोरोनाचे नवे 2 रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.(महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पोलीस दलातील आणखी 237 कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह)

धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास आतापर्यंत एकूण 2311 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 86 जणांचा कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. धारावीतील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून या दाटीवाटीच्या भागात महापालिकेकडून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.(BMC च्या शताब्दी रुग्णालयात PPE किट न देता तरुणाला स्वतःच्या COVID-19 आईचा मृतदेह उचलण्याची जबरदस्ती; दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी)

दरम्यान, मुंबई मध्ये काल 1372 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून 73 जणांचा मृत्यू झाला . त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची 82,074 वर पोहचली आहे. मुंबई सह आता ठाणे, रायगड, कल्याण- डोंबिवली या लगतच्या भागात तर नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. तसेच राज्यात 6,364 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 198 मृत्यूंची नोंद झाली होती. या नंतर राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 1,92,990 वर पोहचली आहे. यापैकी 1,04,687 रुग्ण हे डिस्चार्ज देण्यात आलेले आहेत तर सध्या 79,911 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.