देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांसह बळींचा आकड्यात प्रचंड वाढ झाली आहे. कोविड वॉरिअर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याच दरम्यान आता गेल्या 72 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 237 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.(Coronavirus Cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 138 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6402 वर पोहचली)
राज्यात पोलीस दलातील एकूण 1040 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 64 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य अहोरात्र पार पाडत आहेत. तसेच वयाच्या 55 वर्षापेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात काम करण्यास परवानगी नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; पहा तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?)
237 personnel of Maharashtra Police were found COVID-19 positive in the last 72 hours, taking active number of cases in the force to 1,040. A total of 64 police personnel have succumbed to the infection: Maharashtra Police pic.twitter.com/jMVSbqKV7B
— ANI (@ANI) July 4, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास राज्यातील रुग्णांचा आकडा 3 जुलै 2020 रोजी दिवसभरात एकूण 6,364 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 198 मृत्यूंची नोंद झाली होती. या नंतर राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 1,92,990 वर पोहचली आहे. यापैकी 1,04,687 रुग्ण हे डिस्चार्ज देण्यात आलेले आहेत तर सध्या 79,911 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजवर राज्यात कोरोनामुळे 8,376 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मध्ये काल 1372 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून 73 जणांचा मृत्यू झाला . त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची 82,074 वर पोहचली आहे. मुंबई सह आता ठाणे, रायगड, कल्याण- डोंबिवली या लगतच्या भागात तर नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत.