Coronavirus Cases In Aurangabad: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यात 78 पुरूष आणि 60 महिला रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6402 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. (हेही वाचा - COVID 19 लस बाबत ICMR चा दावा अवास्तव, नामुष्की टाळण्यासाठी आणि लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यासाठी आटापिटा आहे का? पृथ्वीराज चव्हण यांचा सवाल)
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 78 पुरूष, 60 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6402 कोरोनाबाधित आढळले असून 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. .
सविस्तर वृत्त👇🏻https://t.co/a1Q1alencL pic.twitter.com/X1BTbaCmld
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) July 4, 2020
दरम्यान, शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 287 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. सध्या 2989 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी परीक्षण करण्यात आलेल्या 795 स्वॅबपैकी 138 अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरातील 101 जणांचा समावेश असून 37 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, शुक्रवारी राज्यात दिवसभरात एकूण 6,364 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,92,990 वर पोहचली आहे. यापैकी 1,04,687 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 79,911 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.