मुंबईतील क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise Ship Drugs Case) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी आता थेट नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) ला आव्हान दिले आहे. नवाब मलिक आणि एनसीबी (NCB) यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होऊ लागला आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आरोप केला की, क्रुझवर छापा मारला त्यावेळी आर्यन खान (Aryan khan), अरबाज मर्चंड ( Arbaaz Merchant), मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांच्यासह एकूण 14 जनांना पकडले होते. त्यातील 6 जणांना एनसीबीने सोडले. हे सोडलेले लोक कोण होते. त्यांना का सोडले या प्रश्नांचे उत्तर एनसीबीने द्यावे. तसेच, त्यांना सोडतानाचे व्हिडओ फुटेजही एनसीबीने जारी करावी अशी मागणी मलिक यांनी केली.
नवाब मलिक यांनी सांगितले की, आम्ही म्हणालो होतो की, एनसीबीने 11 लोकांना पकडलं आणि 3 लोकांना सोडले. एनसीबी सांगते आहे की, 11 नव्हे 14 लोक होते. आता मी एनसीबीला आव्हान देतो की, क्रुझवर जर 14 लोक पकडले होते तर आणखी 3 लोक कोण होते? तुमच्या कार्यालयतातून तुम्ही बाहेर सोडलेल्या लोकांचे फुटेज जारी करा. एनसीबीने पकडलेले लोक बाहेर सोडले तेव्हा प्रसारमाध्यमांचेही लोक तेथे होतेच. भाजप नेत्यांनी सांगितल्यावरच या लोकांना सोडले काय? असा सवाल उपस्थित करत एनसीबीची ही कारवाई म्हणजे एक 'फर्जीवाडा' आहे असा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी या वेळी केला. (हेही वाचा, Cruise Drug Ships Case: क्रूज ड्रग्स पार्टी छाप्यावेळी एनसीबीने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडले- नवाब मलिक)
पुढे बोलताना नवाब मलिक यांनी सांगितले की, एनसीबीचे दिल्ली येथील अधिकारी सांगत होते की आम्ही जागेवर जाऊन पंचनामा केला. पण माझा प्रश्न आहे की, पाठिमागच्या रविवारी रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास आपण काही फोटो प्रसारमाध्यमांना पाठवले. त्यात एक व्हिडिओही तुम्ही पाठवला. त्यात स्पष्टपणे दिसते आहे की, जप्ती क्रुझ किंवा टर्मिनसवर केलेली नाही. हे सर्व फोटो समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहेत. पाठिमागील पडदेसुद्धा समीर वानखेडे यांच्या कार्यालयातीलच असल्याचा दावा, नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान, मोहीत कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना मलिक म्हणाले, कंबोज यांची नोटीस मला कधी मिळते आहे. माझी एवढी ऐपत आहे. भाजप नेत्यांनी माझी ब्रँड व्हॅल्यू 100 कोटी रुपये ठरवली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला कचरावाला म्हटले. होय, मी कचऱ्याचा व्यवसाय केला. माझे वडील आणि मी काही दिवस भंगाराचा व्यवसाय केला. मला त्याचा अभिमान आहे. मी कोणत्याही प्रकारे सोन्याची तस्करी केली नाही. कोणत्याही मार्केटला बुडवले नाही, असा टोलाही मलिक यांनी मोहीत कंबोज यांना लगावला.