Nawab Malik On K P Gosavi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB), एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Party) सुरु केलेली आरोपांची मालिका कायम ठेवली आहे. समीर वानखेडे यांनी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईवर आक्षेप घेत मलिक यांनी जोरदार आरोप केले आहेत. आतापर्यंत ट्विटर (Twitter) आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एनसीबी आणि भाजप यांच्यावर थेट निशाणा करणाऱ्या मलिक यांनी आज (16 नोव्हेंबर) पुन्हा एकदा नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मलिक यांनी के.पी गोसावी (K P Gosavi) आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून काशिफ खान (Kashiff Khan) आणि समीर वानखेडे यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून हल्ला चढवत म्हटले आहे की, के. पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यात काय संबंध आहेत. एक खबरी आणि के. पी. गोसावी यांच्यात झालेल्या संभाषणाची चौकशी व्हावी. या संभाषणाबाबत काशिफ खान याला का प्रश्न विचारले जात नाहीत? असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला जात आहे. (हेही वाचा, Jalna: परतूर येथील वक्फ जमिनीच्या अनधिकृत खरेदी-विक्रीप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

ट्विट

नवाब मलिक यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपामुळे एनसीबी जोरदार चर्चेत आली आहे. नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या कारवाया आणि नोकरीत मिळवलेले आरक्षण यावरुन मलिक यांनी निशाणा साधला आहे. वानकेडे यांनी जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवत त्या आधारे नोकरी मिळविल्याचा आरोपी यांनी मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपावरुन वानखेडे कुटुंबीय न्यायालयात गेले आहे. या आरोपांवर न्यायालयात सध्या खटला सुरु आहे.