Bandra Railway Station | Photo Credits: Twitter/ ANI

आज मुंबईमध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर (Bandra Railway Station) श्रमिक स्पेशल ट्रेनने मूळ गावी जाण्यासाठी मजुरांची पुन्हा गर्दी पहायला मिळाली. दरम्यान बिहारला (Bihar) जाणार्‍या ट्रेनमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या केवळ 1000 मजुरांना चढण्याची परवानगी दिली आहे. इतरांना पोलिसांनी पुन्हा जाण्याचे आहन केल्यानंतर ते माघारी परतले. मात्र अचानक मजुरांचा लोंढा रस्त्यावर आल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही घटना आज सकाळी 8-9 च्या सुमाराची आहे.

दरम्यान काल (18 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधून आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा असणार्‍यांना थोडी सबुरी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता दोन महिने लॉकडाऊनमध्ये असलेल्यांचा धीर सुटत चालला आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीने आणि मजुरांच्या संख्येनुसार दोन राज्यांच्या समन्वयाने मजुरांची स्पेशल ट्रेनच्या मदतीने ने-आण केली जात आहे. कोरोनाची लक्षणं नसणार्‍यांना महाराष्ट्र राज्य सरकार स्व खर्चाने आपल्या मूळ गावी परतण्यास मदत करत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातून सुमारे 5 लाख मजुर श्रमिक स्पेशल ट्रेन आणि इतर बस सेवेच्या माध्यमातून आपल्या मूळ गावी पाठवण्यात आले आहेत.

ANI Tweet

वांद्रे स्थानकातील गर्दी पांगवल्यानंतरची चित्र  

Lockdown: मुंबईतील Bandra Station बाहेर पुन्हा मजूरांची गर्दी; श्रमिक रेल्वेसाठी जमल्याची माहिती - Watch Video

एप्रिल महिन्यातही वांद्रे स्थानकावर अशाप्रकारेच मजुर अचानक रस्त्यावर आल्याने पोलिस आणि प्रशासन यंत्रणेची धांदल उडाली होती. त्यावेळेसही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिकांनी मजुरांना काही दिवस धीर धरण्याचं आवाहन करत तुम्हांला सुरक्षित पोहचवले जाईल याची खात्री बाळगा असं भावनिक आवाहन करण्यात आलं होतं.