Mumbai News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ऑटो चालकाला अटक मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. मुंबईतील पवई परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची खासगी क्लासेस वरून घरी परतत असताना ऑटोचालकाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तीने पालकांना सांगितली. पालकांनी ही घटना पोलीसांना सांगितली. ही घटना शनिवारी दुपारी 12.00 ते 12.45 च्या दरम्यान घडली.
तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी पवईच्या हिरानंदानी भागातून तिच्या घराकडे जात होती परंतु JVLR (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड) पुलाजवळ, ऑटो चालकाने अल्पवयीन मुलीच्या मांडीवर डावा हात फिरवण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने या कृत्याला नकार दिल्या नंतर ऑटोचालकाने ‘मुझे अच्छा लगता है’ असे उत्तर दिले. मुलीने हा सगळा प्रकार तिच्या पालकांना सांगितला.
आरोपीविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आयपीसी 354, 354 (ए) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटने अंतर्गत पोलीसांना बंशम जोशी या आरोपीला अटक केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी हा मध्यधूंद अवस्थेत असताना हे कृत्य केले आहे. अटक केल्यानंतर आरोपीने गुन्हा कबुल केला आहे.