डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांचा अंतरिम जामीन विशेष कोर्टाने फेटाळला
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

येस बॅंक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्या वाधवान कुटुंबियांपैकी कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, 29 एप्रिलपर्यंत दोघेही सीबीआयच्या ताब्यात राहणार आहेत. यातच कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांचा अंतरिम जामीन विशेष कोर्टाने फेटाळून (Mumbai court denies bail) लावला आहे. या दोघांच्या सीबीआय कोठडीत 4 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाधवान बंधूंना त्यांच्या महाबळेश्वर येथील बंगल्यातून रविवारी अटक करण्यात आली होती, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे.

भारतात कोरोना विषाणूने वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, राज्यात करोनामुळे कडक अमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह 23 जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. हे देखील वाचा- बुलंदशहर हत्या प्रकरण: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा योगी आदित्यनाथ यांना फोन; पाहा काय म्हणाले?

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान वाधवान यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘येस बॅंक’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. वाधवान पिता पुत्रांना फेब्रुवारी महिन्यातच जामीनावर सोडण्यात आले होते.