भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड मुंबई काँग्रेस अध्यक्ष (Mumbai Congress President)म्हणून झाली. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांची ही निवड काँग्रेस पक्षाला मुंबई (Mumbai ) शहरात उभारी देईल अशी आशा व्यक्त होत आहे. भाई जगताप यांनी त्या दृष्टीने तसे प्रयत्नही सुरु केले आहेत. मात्र, हे प्रयत्न काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा यश मिळवून देतील तेवाच ते यशस्वी झाल्याचे मानले जाणार आहे.
गटातयाच्या राजकारणाला छेद
मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पक्षातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी गटातटाच्या राजकारणाला छेद देत गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसते आहे. (हेही वाचा, Maharashtra Congress State Presiden: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीकडे पाहिजेत हे गुण)
काँग्रेसमधील मतमतांतरे भेदणार का?
काँग्रेस पक्षात प्रत्येक नेत्याचा एक स्वतंत्र गट असल्याचे पाहायला मिळते. हे गट नेहमीच आपापल्या राजकीय सोयीसाठी एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. यात पक्षांतर्गत स्पर्धा वाढून आपल्याच पक्षाचे उमेदवार निवडणूकीत पाडण्याचे प्रयत्न होता. अशा गोष्टी सर्वच राजकीय पक्षात होत असल्या तरी काँग्रेस पक्षाला याचा मोठा फटका बसताना दिसला आहे. त्यामुळे अशा गटातटांवर भाई जगताप कसा मार्ग काढतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
Courtesy meet of Ms @PriyaDutt_INC at @INCMumbai office. Had fruitful discussion with MRCC President @BhaiJagtap1 on current political scenario in Mumbai & future course of strategy for BMC elections. @kcvenugopalmp @HKPatil1953 pic.twitter.com/b95xqGHkq9
— Charan Singh Sapra (@Charanssapra) January 11, 2021
भाई जगताप यांचे मूळ नाव अशोक अर्जूनराव जगताप असे आहे. मात्र, सर्व महाराष्ट्राला ते भाई जगताप नावानेच परिचीत आहेत. या आधी ते विधानसभेवर निवडून गेले होते. सध्या ते विधान परिषदेवर आमदार आहेत. 2001 मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत काम करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणूक 2004 मध्ये ते खेतवाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तिकीटावर विजयी झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावर झाली आहे.