Mumbai Coastal Road Update: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वाहतुकीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाचा तिसरा टप्पा आजपासून म्हणजेच ११ जुलैपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर, सामान्य लोकांना हाजी अली ते खान अब्दुल गफ्फार खान रोडपर्यंत काही मिनिटांत कोणत्याही रहदारीशिवाय प्रवास करता येईल. त्याचवेळी, सरकारकडून सांगण्यात आले की, यासह, हाजी अलीची शाखा 8 (लोटस जेटी जंक्शनपासून उत्तरेकडील लेनवरील हाजी अलीच्या मुख्य पुलापर्यंत) आजपासून सुरू झाली आहे.
कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सुरू
#WATCH | Maharashtra | The third phase of the Dharmaveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Mumbai Coastal Road (South) Project, allows temporary travel from Haji Ali to Khan Abdul Ghaffar Khan Road, and the Haji Ali's Arm 8 (from Lotus Jetty Junction to the main… pic.twitter.com/gKg4TtHEdi
— ANI (@ANI) July 11, 2024
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ते शुक्रवार हा विभाग सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असेल. उर्वरित प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस बंद राहणार आहेत.
गेल्या महिन्यात दुसरा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होताः
यापूर्वी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 11 जूनपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 जून रोजी करण्यात आले होते. हाजी अली आणि अमरसन्स दरम्यान हा बोगदा 6.25 किलोमीटर लांब आहे.