शिवसेना-भाजप युतीबाबत सकारत्मक चर्चा- देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-ट्वीटर)

आगामी लोकसभा निवडणुकाच्या (Lok Sabha Election) तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरीही राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी (14 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी भाजप (BJP)-सेना (Shivsena) युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे पत्रकारांना सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल मातोश्रीवर भेट देत युतीबाबत चर्चा केली. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना पक्षाकडून किती जागा लढवल्या जाणार यावरही चर्चा करण्यात आली. तर भाजप हा 25 आणि शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच युतीबाबात निर्णय होण्याच्या हेतूने फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीसाठी मातोश्रीवर उपस्थित होते. (हेही वाचा-'महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ होतो आणि राहणार'- खासदार संजय राऊत)

तसेच काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ होतो आणि राहणार असे म्हटले होते. तर 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने एकत्र मिळुन निवडणुक लढवली होती. त्यावेळी महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागांपैकी शिवसेनेला 20 जागांवर निवडणुक लढविण्यात आली होती. त्यातील 18 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता. तसेच भाजपने 24 जागांवर निवडणुक लढविली होती आणि 23 जागांवर विजय मिळवला होता.