मुंबई: सतत ऑनलाईन व्हिडिओ पाहत असल्याच्या कारणावरून 22 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

सतत ऑनलाईन व्हिडिओ पाहत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुंबईतील MIDC भागातील एका तरूणाने 22 वर्षीय त्याचा पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेतन चौघुले (Chetan Chowgule)असे आरोपीचं नावं असून तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला असून त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली आहे.

MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन वर IPC 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन आणि त्याची पत्नी आरती यांच्यामध्ये सतत वाद, भांडणं होत असत. मंगळवारी रात्रीदेखील त्यांच्यामध्ये पैशाच्या मागणीवरून आणि आरतीच्या ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यावरून वाद झाला. पहाटे चार वाजतादेखील आरती व्हिडिओ पाहत असल्याचं बघून चेतन आणि आरतीमध्ये पुन्हा वाद झाला रागाच्या भरात चेतनने आरतीचा गळा एका प्लॅस्टिक रोपने दाबला.

काही वेळाने आरती काहीच प्रतिसाद देत नाही हे समजताच चेतन स्वतः सकाळी 4.30 वाजता पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चेतन बेरोजगार होता. त्यामुळे चेतन आणि आरतीदरम्यान अनेकदा वाद होत असतं.