
भारतीतील पहिली खासगी ट्रेन तेजस एक्सप्रेसने (Tejas Express) प्रवास करणाऱ्यांसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. कारण आता मुंबई- अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या सामानाचा बोझा उचलावा लागणार नाही आहे. यासाठी प्रवाशाकडून 100 रुपये प्रति किलो प्रमाणे सामान आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी शुल्क स्विकारले जाणार आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि आयआरसीटीसीच्या माध्यमातून तेजस एक्सप्रेसच्या या प्रोजेक्टवर काम करत आहे. तर प्रवाशाच्या सामानाची ने-आण एक स्टार्टअप कंपनीच्या माध्यमातून केली जाणार असून तेथील कर्मचारी ट्रेन पोहचायच्या आधीच सामान उचलणार आहेत.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशाचे सामान ते ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी ट्रेन येण्याच्या आधीच पोहचणार आहेत. याचा मुख्यत्वे लोकल आणि पब्लिक सेक्टरने प्रवास करत तेजस एक्सप्रेससाठी बोरिवली किंवा मुंबई सेंट्रेलला जावे लागते. त्यासाठी पुन्हा वेगळी गाडी किंवा टॅक्सीचा अधिक खर्च येतो. त्यामुळेच आता तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान आधीच पोहचवले जाणार आहे.(तेजस एक्सप्रेसच्या प्रवाशांना IRCTC चे खास गिफ्ट; तिकिटासोबतच टॅक्सी, हॉटेल बुकिंग ते व्हीलचेअर पासून सुविधा सुद्धा मिळणार)
तेजस एक्सप्रेस मुंबई ते अहमदाबाद ही नोव्हेंबर दरम्यान सुरु होणार आहे. तसेच त्यासाठी नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढेच त्याचे भाडे असणार आहे. तेजस अहमदाबाद येथून सकाळी 6.10 मिनिटांनी निघणार असून मुंबई सेंन्ट्रलला 1.10 मिनिटांनी पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ती 3.40 मिनिटांनी निघणार असून अहमदाबादला 9.55 मिनिटांनी पोहचणार आहे. मुंबई सेन्ट्रल ते अहमदाबाद दरम्यान बोरिवली, वापी, सुरत आणि वडोदरा या ठिकाणीच थांबवण्यात येणार आहे.