Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Local Night Traffic and Power Block Today:  मुंबई शहरातील मध्य रेल्वेच्या मार्गावर आज (28 फेब्रुवारी) चार तासांचा नाईट ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान विद्याविहार रेल्वे स्थानकामधील (Vidyavihar Railway Station) जुना पूल पाडण्यासाठी हा विशेष नाईट ब्लॉक (Night Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री 12 ते उद्या पहाटे (29 फेब्रुवारी) सकाळी 4 वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. या कामकाजाच्या वेळेस माटुंगा- मुलूंड (Matunga- Mulund) स्टेशन दरम्यानदेखील नाईट ब्लॉक घेऊन 5 आणि 6 क्रमांकाच्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत मुंबई लोकलसोबतच एलटीटी स्थानकातून सुटणार्‍या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेतदेखील बदल करण्यात आला आहे.

कोणकोणत्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले?

लोकामान्य टिळक टर्मिनल्स ते भुवनेश्वर एक्सप्रेस ही गाडी आज रात्री 12.15 ऐवजी सकाळी 4.30 वाजता सुटणार आहे. तर एलटीटी - मांडूवाडी ही गाडी 12.35 ऐवजी पहाटे 5 वाजता सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनन्स- मडगाव डबल डेकर रात्री 1.10 ऐवजी 5.10 वाजता चालवली जाणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसोबतच मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडणार आहे. भायखळा स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी 7 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत राहणार बंद.  

मध्य रेल्वेचं ट्वीट

दरम्यान मुंबई लोकल दर आठवड्याला रविवारी दिवसकालीन मेगा ब्लॉक घेतो. या ब्लॉक दरम्यान रेल्वे रूळाच्या डागडुजीप्रमाणेच, सिग्नल यंत्रणा आणि इतर तांत्रिक काम केले जाते. हा दर आठवड्याचा मेगाब्लॉक सकाळी 11 ते 4 या वेळेत घेतला जातो. या वेळेत अनेक मुंबई लोकल रद्द केल्या जातात. तर काही ठराविक फेर्‍या पर्यायी मार्गिकांवरून चालवल्या जातात.