Mumbai Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकादरम्यान पाटणा एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल!
Central Line Delayed Due to Technical Glitch (Photo Credits: File Photo)

डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकादरम्यान पाटणा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड आला आहे. यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. परिणामी, मध्य रेल्वेची (Mumbai Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्वच गाड्यांचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. सध्या मध्य रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या याठिकाणी रेल्वेचे इंजिन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकादरम्यान एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्ये रेल्वेची वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. कल्याण–पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे एक्स्प्रेस ठाकुर्ली स्थानकाजवळ थांबली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या याठिकाणी रेल्वेचे इंजिन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. हे देखील वाचा- पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल मध्ये लवकरच 'शॉपिंग ऑन व्हिल्स'चा पर्याय होणार खुला

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर आता लवकरच चर्चगेट ते विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांना खरेदीचा आनंद घेता येणार आहे. मागील वर्षी पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 'शॉपिंग ऑन व्हिल्स'चा पर्याय खुला करण्यात आला आहे. आता त्याच धर्तीवर आता मुंबई लोकलमध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितल्याचे वृत्त मुंबई मिररला दिले आहे.