पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल मध्ये लवकरच 'शॉपिंग ऑन व्हिल्स'चा पर्याय होणार खुला
AC Local | (Photo Credits: Twitter)

पश्चिम रेल्वे मार्गावर आता लवकरच चर्चगेट ते विरार एसी लोकल ( Churchgate-Virar AC Local) मध्ये प्रवाशांना खरेदीचा आनंद घेता येणार आहे. मागील वर्षी पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 'शॉपिंग ऑन व्हिल्स' (Shopping On Wheels) चा पर्याय खुला करण्यात आला आहे. आता त्याच धर्तीवर आता मुंबई लोकलमध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितल्याचं वृत्त मुंबई मिररला दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉस्मॅटिक, वैद्यकीय गरजेच्या वस्तू, लॅपटॉप, मोबाईलच्या आवश्यक सामग्री, स्टेशनरी आणि खेळणी विकली जाणार आहे. विमानप्रवासाप्रमाणेच आता मुंबईच्या एसी लोकलमध्ये 'शॉपिंग ऑन व्हिल्स'ची तयारी सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर ऑन बॉर्ड सेल सुविधा ही सुरूवातीला सकाळी 8 ते 9 दरम्यान धावणार्‍या लोकलमध्ये सुरू केली जाणार आहे. दरम्यान एकदा दिले जाणारे कंत्राट 5 वर्षांसाठी दिले जाणार आहे.

मुंबईमध्ये सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर चालवल्या जाणार्‍या रेल्वे फेर्‍यांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे. सामान्य मुंबई लोकलच्या तुलनेत फर्स्ट क्लासच्या 1.3 पट एसी लोकलचं तिकीट आहे. मुंबई लोकल गर्दीच्या वेळेस खचाखच भरलेली असते. त्यामुळे एसी लोकलमध्ये लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये प्रवासी फार काळ बसलेले असतात त्यामुळे आता या वेळेत आता प्रवाशांना वस्तू विकत घेण्यासाठी ही नवी सोय करण्यात आली आहे.