Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

Mumbai Carriageway Closed: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) चा मुंबई कॅरेजवे (Mumbai Carriageway) गुरुवारी दुपारी 1.30 ते दुपारी 3.30 पर्यंत दोन तासांसाठी बंद राहणार आहे. या महामार्गावरून हलकी, जड आणि मल्टी-एक्सेल वाहने चालवण्यास मनाई आहे. या महामार्गावर एमएसआरडीसी ITMS (इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम) अंतर्गत दोन गॅन्ट्री बसवण्यात येणार आहेत.

पळस्पे जवळ द्रुतगती मार्गाच्या मुंबई कॅरेजवेवर 29.40 किमी आणि 9.80 किमी अंतरावर दोन लेन सेवायोग्य गॅंट्री उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पेट्रोलिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी दिली आहे. (हेही वाचा - Mumbai News: आंतराराष्ट्रीय परमिटच्या वादातून अंधेरी RTO अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक)

भोसले यांनी सांगितले की, एक्स्प्रेसवेचा मुंबई कॅरेजवे बंद असताना पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व हलकी वाहने आणि प्रवासी बस खोपोली एक्झिटमधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (NH48) वळवल्या जातील. (हेही वाचा -Woman Burns Snake's Body In Vasai: बापरे बाप!! वसईतील सोसायटीमध्ये निघाला साप; महिलेने सापाला मारून मृतदेह जाळला, गुन्हा दाखल)

शेडुंग फाट्यावरून वाहने वळवण्यात येतील -

तसेच, सर्व जड आणि मल्टी-एक्सल वाहने खालापूर टोल प्लाझाजवळून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे शेडूंग टोल प्लाझावर जाण्यासाठी वळवण्यात येतील. बोर्ले टोल प्लाझावर जाण्यासाठी शेडुंग फाट्यावरून वाहने वळवली जातील.