Mumbai: मुंबईतील व्यवसायिक प्रशांत तुकाराम विचारे यांचा मृतदेह वाशी खाडीत आढळला
Dead Body | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबई (Mumbai) येथील एका व्यावसायिकाचा मृतदेह वाशी खाडीत आढळून आला आहे. वाशी खाडी (Vashi Creek) जवळून जाणाऱ्या काही प्रवाशांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. त्यानंतर त्यांनी वाशी पोलिसांना (Vashi Police Station ) माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मृतदेह भांडुप उपनगरातील प्रशांत तुकाराम विचारे (Prashant Tukaram Vichare) या 54 वर्षीय व्यावसायिकाचा असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मृतदेहाबद्दल अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मृतदेह खाडीमध्ये नेमका आला कसा याबाबत पोलीस तपास सुरु आहे. प्रशांत विचारे हे व्यवसायिक आहेत. त्यांचा मृतदेह खाडीत सापडल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत. (हेही वाचा, China: रूग्णालयात मृत घोषित केलेली व्यक्ती शवागारात जिवंत आढळली; Shanghai मधील धक्कादायक प्रकार)

पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.