मुंबई: पगार न दिल्याने ड्रायव्हर संतप्त, जाळल्या 5 लक्झरी बस गाड्या
Fire (Photo Credits: ANI)

बोरिवली (Borivali) येथे एका ड्रायव्हरने चक्क 5 लक्झरी बस गाड्या जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. तर मालकाने पगार न दिल्याच्या संतापात या ड्रायव्हरचे या बसेस जाळल्याची माहिती समोर आली आहे. तपासापूर्वी बसेस शॉर्ट सर्किटमुळे जळल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र जेव्हा सत्य समोर आले त्यावेळी ड्रायव्हरला अटक केली आहे.(Fire At Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत विरोधी पक्षनेता, गटनेता कार्यालयाला आग; आग आटोक्यात आणण्यात यश)

लक्झरी बसेस जळल्या तेव्हा प्रथमदर्शी असे दिसून आले की, शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली आहे. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करताना बस चालकला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ड्रायव्हरची सखोल चौकशी केली असता त्यानेच 5 लक्झरी बस जाळल्याची कबुली दिली. तर मालकाने पगार न दिल्याच्या रागातून आपणचहा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, ड्रायव्हरला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. जाळण्यात आलेल्या पाच लक्झरी बसची किंमत 3 कोटी रुपयांहून आहे. परंतु बसेसचा विमा काढण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.(Serum Institute Fire: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू; इमारतीत चालू असलेल्या वेल्डिंगमुळे आग लागल्याचा अंदाज)

तर काही दिवसांपूर्वी  ठाणे शहरातील वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला आग लागल्याची माहिती समोर आली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या  होत्या. तसेच ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.