Fire At  Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत विरोधी पक्षनेता, गटनेता कार्यालयाला आग; आग आटोक्यात आणण्यात यश
Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला आग (Fire At Nashik Municipal Corporation) लागल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती कळताच नाशिक अग्निशमन दलाच्या (Nashik Fire Brigade) गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग लागलेल्या परिसरात प्रचंड प्रमाणावर धूर आहे. धुराचे लोट बाहेर पडत आहेत. त्यामुळे ही आग नेमकी कोणकोणत्या दालनाला लागली आहे याबाब स्पष्टता नाही. तसेच, कार्यालायत कोणी व्यक्ती आहेत का याबाबततही माहिती मिळू शकली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कार्यरत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आगीची ही तिसरी घटना आहे. काल (21 जानेवारी 2021) दुपारी 1.15 वाजणेच्या सुमारास पुणे येथील सीरम इन्स्ट्यीट्यूट इमारतिला आग लागली होती. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी भंडारा येथेही जिल्हा रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत 10 बालकांचा जळून मृत्यू झाला होता. तर 7 बालकांना वाचविण्यात यश आले होते. (हेही वाचा, Serum Institute Fire: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू; इमारतीत चालू असलेल्या वेल्डिंगमुळे आग लागल्याचा अंदाज )

भंडारा येथील घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. तसेच, भंडारा येथील घटनेची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेशही दिले होते. दरम्यान, नाशिक महापालिकेचे फायर ऑडीट करुन घेण्यात आले होते का? याबातब निश्चित माहिती मिळू शकली नाही.