वॉलेट रिचार्ज तिकिटावर प्रवाशांना मिळाणार 5 टक्के अतिरिक्त बोनस
UTS App (Photo Credits- Twitter)

दररोज सकाळी तिकिटासाठी रांगेतल्या गर्दीमध्ये उभे रहावे लागते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने अलीकडचे डिजिटल पद्धतीने तिकिट काढण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता आर वॉलेट रिचार्ज असणाऱ्या तिकिटांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून 5 टक्के अतिरिक्त बोनस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सेवेसाठी प्रशासनाकडून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून 24 ऑगस्ट पर्यंत वॉलेट रिजार्चवर बोनस देण्यात येणार आहे. तर लोकल तिकिटासाठी स्मार्ट कार्ड. एटीव्हीएम आणि जेटीबीएससाठी सुद्धा ही सुविधा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे युटीएस अॅप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.(हेही वाचा-भारतीय रेल्वे प्रशासनाकडून तिकिट बुकिंग संबिधित नियमात बदल, प्रवाशांना मिळणार आता संयुक्त पीएनआर क्रमांक)

तसेच प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे वॉलेट रिजार्जसाठी मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा तिकिट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा सुद्धा वेळ वाचणार आहे.