
मुंबई महापालिकेच्या माजी इंजिनिअर अधिकाऱ्याच्या घरावर ईडी कडून छापेमारी करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. या प्रकरणी सदर अधिकाऱ्याने दुबईत कथित रुपात अवैध पद्धतीने संपत्ती खरेदी केल्याचा आरोप लावण्यात आला असून त्याच्याकडून दुबईतील प्रॉपर्टीचे कागदपत्र हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चर्चा सुरु झाली असून ईडी कडून अधित तपास केला जात आहे. मात्र महापालिकेच्या या माजी इंजिनिअर अधिकाऱ्याचे नाव देवेंद्र नटवरलाल देसाई असे आहे. देसाई हा एक दशकापूर्वी महापालिकेतून सेवानिववृत्त झाला होता.
ईडीने त्यांच्या अधिकृत विधानात असे म्हटले आहे की, देसाई याने दुबईतील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली होती. या प्रॉपर्टीचे वर्षभरासाठीचे भाडे 13 लाख रुपये आहे. यासाठी देसाईने 40 लाख रुपये त्याच्या युएस येथील विवाहित मुलीला पाठवले होते. तर महापालिकेत नोकरीच्या वेळी एका प्रोजेक्टधील पैसे लुटले होते. त्यानंतर या प्रोजेक्टमधील पैसे त्याने परदेशात गुंतवले आणि हे कायद्याच्या विरोधात आहे. ईडीने छापेमारी केल्यानंतर परदेशातील गुंतवणूक आणि पैसे पाठवले गेल्याचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत.(मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले; त्यांच्याकडे पुतळ्यांसाठी पैसे आहेत परंतु सार्वजनिक आरोग्यासाठी नाहीत? असा विचारला सवाल)
देसाई याने दुबईत 2012 मध्ये 70 लाख रुपयांना प्रॉपर्टी खरेदी केल्याचे म्हटले आहे. ही प्रॉपर्टी त्याने त्याच्या नावासह बायको आणि मुलाच्या नावासोबत खरेदी केली होती. यावर ईडीने देसाई याला याबाबत अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने ती अवैधरित्या पैशांनी खरेदी केलेली प्रॉपर्टी असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.