राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी (1 मार्च) मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai BMC Election) शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. पवार यांनी असे म्हटले आहे की, महापालिकेत शिवसेना अव्वल स्थानी असल्याने त्यांनी तेथेच रहावे. कारण त्यांनी आता आमच्यासोबत गठबंधन केले आहे. मात्र राष्ट्रवादी पुढील महानगरपालिका निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न जरुर करणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मित्रपक्षाच्याबाबत कोणताच गैरसमज नसला पाहिजे. येत्या काळात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार आहे.
गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांना मुंबई महापालिकेच्या महापौर पदी निवड करण्यात आली. तर उपमहापौर पद हे शिवसेनेचेच सुहास वाडकर यांना दिले होते. खरंतर महापौर पदासाठी शिवसेनेशिवाय कोणत्याही अन्य पक्षाने त्यांचा उमेदवार महापालिका निवडणूकीसाठी रिंगणात उतरवला नव्हता. मुंबई महापौर पदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो. यापू्र्वी फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपच्या समर्थनाने शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर पदी विराजमान केले होते. महाडेश्वर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर किशोर पेडणेकर यांना महापौर पदी नियु्क्ती करण्यात आली.(नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याने जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी)
Maharashtra Deputy Chief Minister & NCP leader Ajit Pawar in Mumbai: NCP workers should not have misconceptions or misunderstandings about our partners because in the coming days we have to contest elections together. https://t.co/wLKSfaHIew
— ANI (@ANI) March 1, 2020
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे 93 नगरसेवक, भाजपकडे 83 आणि काँग्रेस 29 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी 9 जागांवर समाधान मानत हरली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 2019-20 महापालिकेचे बजेट 30,692 कोटी रुपये आहे. तर 2016-17 मध्ये हे बजेट 37,052 कोटी रुपये होते. एवढ्या कोटीच्या बजेटच्या रक्कमेमुळेच देशातील सर्वात श्रीमंत म्हणून महानगरपालिकेला ओळखले जाते. हे बजेट नागालँड,मेघालय, सिक्किम आणि गोवा यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे.