मुंबई विमानतळावर Europe आणि Middle East मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी BMC कडून क्वारंटाइन संदर्भात नव्या गाइलाइन्स जाहीर
Coronavirus scanner at airports | (Photo Credit: Twitter)

युरोप (Europe) आणि मध्य पूर्व  (Middle East) येथून मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेकडून  (BMC) नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या प्रोटोकॉल नुसार, या देशांतून येणाऱ्या नागरिकांना बुधवार पासून 7 दिवसांसाठी इंस्टिट्युशन क्वारंटाइन अनिवार्य असणार आहे. या दिवसांच्या क्वारंटाइनच्या काळातील 5 व्या आणि 7 व्या दिवशी त्यांची Rt-PCR चाचणी केली जाणार आहे. तर ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आपल्या घरी जाता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत त्यांनी 7 दिवस होम क्वारंटाइन रहावे असे ही आवाहन करण्यात आल्याचे आरोग्य विभागातील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राबाहेरील जर एखादा प्रवासी असल्यास त्याला त्याच्या गंतव्य ठिकाणी जाऊ दिले जाणार आहे. पण या प्रवाशांचा गाडी क्रमांक, दुसऱ्या राज्यातील पत्ता आणि त्या राज्यातील चीफ सेक्रेटरीला त्याच्या बद्दल कळवले जाणार आहे. त्यांना दुसऱ्या राज्यात जाण्याची पूर्णपणे परवानगी असणार आहे. परंतु जे प्रवासी महाराष्ट्रातील स्थानिक नागरिक असणार आहेत त्यांना 7 दिवस इंस्टिट्युशनल क्वारंटाइन अनिवार्य असणार आहे.(Koregaon Bhima Shaurya Din 2020: कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

महापालिकेचे उपायुक्त आयुक्त अनिल वानखेडे यांनी असे म्हटले की, जे प्रवासी मुंबईत येतील पण महाराष्ट्राच्या बाहेरील असतील त्यांच्याकडे Rt-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे असणार आहे. महापालिकेच्या मते, मंगळवारी युके येथून जवळजवळ 591 प्रवासी परतले आहेत. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असून युके येथून आल्याने त्यांना हॉटेल मध्ये 7 दिवसांच्या इंस्टिट्युशन क्वारंटाइन करिता ठेवण्यात आले आहे.

युके येथून आलेल्या जवळजवळ 300 जणांना पुढील 7 दिवसांसाठी हॉटेलमध्ये इंस्टिट्युशनल क्वारंटाइनसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांची Rt-PCR ही चाचणी होणार असून ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी जाता येणार आहे. 591 प्रवाशांपैकी 236 हे महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. त्यांना ही इंस्टिट्युशनल क्वारंटाइन केले जाणार आहे.(Coronavirus Vaccination: मुंबईमध्ये कोरोना व्हायरस लसीकरणासाठी BMC ची जोरदार तयारी; कर्मचार्‍यांना 7 जानेवारीपर्यंत प्रशिक्षण, 80 हजार Health Workers ची नोंदणी)

हॉटेलचे दर प्रत्येक दिवसाच्या रात्रीसाठी हे 1000 ते 4500 दरम्यान आहेत. यामध्ये तीन वेळचे खाणे आणि संध्याकाळची चहा दिली जाणार आहे. नागरिकांना त्यांना परवडणाऱ्या पैशात हॉटेल निवडता येणार आहे. तर प्रत्येत दिवसाला 2 हजार प्रवासी हे युरोप आणि मिडल इस्ट येथून येत असल्याचे ही वानखेडे यांनी म्हटले आहे.