मुंबई: अमित शाह यांची गोरेगाव येथे नेस्को सभागृहात सभा
BJP National President Amit Shah | (Photo credit : Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को (Nesco Hall) सभागृहात भाजपतर्फे शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर राज्यातून 370 कलम हटवण्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात आणण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळे अमित शाह हे कलम 370 वर मुंबईत भाषण देणार आहेत.

कलम 370 चा शहरी मतदारांवर चांगलाच प्रभाव आहे, असे भाजपला वाटते. त्यामुळे हा मुद्दा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा भाजप विचार करत आहे. दरम्यान, निवडणूका म्हटले की, मतदारांसमोर जाताना अनेक मुद्दे घेऊन जाता. विद्यमान स्थिती पाहिली तर, बेरोजकारी, आर्थिक मंदी, ऑटो इंडस्ट्री, शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, महापूर, शिक्षण यांसह इतर विषयांवर अमित शाह काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या US प्रवासासाठी पाकिस्तान कडून हवाई हद्द खुली करण्यास नकार.

निवडणूक प्रक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिव असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल.