Mumbai: लुडो गेममुळे ट्रेनमध्ये झाली हाणामारी, दोन भावांनी सहप्रवाशाला बेदम मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुन्हा दाखल
Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

Mumbai: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये लुडो गेम खेळण्यावरुन तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये सकाळी 11.30 वाजता झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.(Kalyan Crime News: कल्याण येथे नामांकीत ज्वेलर्सकडून ग्राहकांना दीड कोटींचा चुना; मासिक भिशी योजनेच्या नावाखाली फसवणूक)

तीन जण मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. त्याचदरम्यान, एकाने दुसऱ्याला त्याच्या हाताच्या कोपऱ्याने ढकलले. त्याचवेळी वाद सुरु झाला. वाद ऐवढा टोकाला गेला की, दोन भावंडांनी त्यांच्या सोबत खेळणाऱ्या सहप्रवाशाला बेदम मारहाण केल्याचे बोरिवली शासकीय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.(Mumbai Local: लवकरच मिळू शकते लसीकरण न झालेल्या लोकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी; न्यायालयाने दिले 'हे' आदेश)

मारहाण सुरु असतानाच लोकलमधील एका व्यक्तीने त्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियात पोस्ट केला. तपासात असे दिसून आले की, तीन जण हे नालासोपारा आणि भाईंदर येथे राहणारी रहिवाशी आहेत.भाईंदर ते चर्चगेट दरम्यान ते तिघे प्रवास करत होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेत कलम 160 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.