Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Airport Operations Disrupted Due to Rain: आज मुंबई तसेच उपनगरात जोरदार पाऊस (Rain) कोसळला. कमी दृश्यमानता आणि पावसामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhattrapati Shivaji Maharaj International Airport) विमानसेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती. शहरातील खराब हवामान आणि धुळीच्या वादळांमुळे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ने कमी दृश्यमानता आणि सोसाट्याचा वारा यामुळे सुमारे 66 मिनिटांसाठी फ्लाइट ऑपरेशन तात्पुरते स्थगित केले. ऑपरेशन 17:03 वाजता पुन्हा सुरू झाले, असे विमानतळाने एका निवेदनात म्हटले आहे.

यादरम्यान, विमानतळावरील 15 उड्डाणे वळवण्यात आली. सीएसएमआयएने गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व धावपट्टीची देखभाल यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. ज्यामुळे विमानांचे सुरक्षित आणि सुरळीत कामकाज सुनिश्चित झाले.  कार्यक्षमता आणि प्रवासी सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचं CSMIA ने निवेदनात नमूद केलं आहे. (हेही वाचा -Mumbai Rains: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग)

मुंबई आणि लगतच्या भागात पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मेट्रो आणि लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. भारतीय हवामान खात्याने (IMD) ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवत चेतावणी जारी केली आहे. (वाचा - Fire at High Tension Tower of Power Line in Airoli: ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग, लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत)

आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस येत्या 3-4 तासांत मुंबईतील काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तथापी, मेट्रो रेल्वेच्या प्रवक्त्याने पीटीआयने सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे वायरवर बॅनर पडल्याने आरे आणि अंधेरी पूर्व मेट्रो स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. (हेही वाचा - Mumbai Metro 1 Service Affected: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो विस्कळीत; तारांवर कोसळलं बॅनर)

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ओव्हरहेड उपकरणाचा खांब वाकल्याने मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा प्रभावित झाली. तसेच मेन लाईनवरील उपनगरी सेवा बंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा दिला असतानाच ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि अन्य काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. याशिवाय मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही नोंद करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ - 

दादर, कुर्ला, माहीम, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर दक्षिण मुंबईतील काही भागात रिमझिम पाऊस झाला. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगर या सॅटेलाइट टाउनमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस झाला.