Fire at High Tension Tower of Power Line in Airoli: मुंबई (Mumbai) सह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसला आहे. ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग लागल्याने लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या सर्वांचा परिणाम मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप, ठाणे, बदलापूर, मुलुंडूमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे. घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक पडणाऱ्या पावसामुळे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील लोकल वेळापत्रकाच्या उशिराने धावत आहेत. (हेही वाचा - Mumbai Metro 1 Service Affected: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो विस्कळीत; तारांवर कोसळलं बॅनर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)