Mumbai Metro | Representational Image | (Photo Credits: ANI)

वर्सोवा-अंधेरी घाटकोपर या मार्गावर चालवली जाणारी मुंबई मेट्रो (Mumbai Metro) सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आता या मार्गावर वर्सोवा स्टेशन (Versova Station) जवळ सायकल रेंटवर म्हणजेच भाडेतत्त्वावर देण्याची नवी सुविधा 16 जानेवारी, शनिवार पासून सुरू होत आहे. प्रतितास 2 रूपये या दराने आता मुंबईकरांना ही सेवा वापरता येणार आहे. यापूर्वी जागृती नगर मेट्रो स्टेशनवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. लवकरच घाटकोपर-वर्सोवा मार्गावर 8 अजून नव्या स्थानकांवर सायकलची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईकरांना दिलासा! Mumbai Metro चालवणार 230 गाड्या, 18 जानेवारीपासून ऑपरेटिंग तासही वाढणार.

मेट्रोवरील या बायसिकल वर जीपीएस सुविधा असेल. आठवड्याच्या किंवा महिन्याच्या प्लॅनवर ही सायकल आता उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान यासाठी तुम्हांला त्यांचं सायकल शेअरिंग मोबाईल अ‍ॅप MyByk डाऊनलोड करावं लागणार आहे. त्याच्याद्वारा ही सर्व्हिस तुम्हांला मिळू शकते. विकली पास 280 तर मंथली पास 900 रूपयाला उपलब्ध असेल.

18 जानेवारीपासून मुंबई मेट्रो दिवसाला 230 फेर्‍या चालवणार आहे. ऑक्टोबर महिन्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत मेट्रो सेवा मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.आता  नव्या वेळेनुसार वर्सोवाहून पहिली मेट्रो  सकाळी 7.50 वाजता आणि घाटकोपर येथून सकाळी 8.15 वाजता सुटेल. तसेच घाटकोपर येथून शेवटची मेट्रो रात्री 10.15 वाजता व वर्सोवा येथून रात्री 9.50 वाजता सुटेल.