मुंबई शहरातील (Mumbai Police) अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी (Dharavi) परिसरातील क्रीडा वर्तुळात धक्कादायक घटना घडली आहे. एका कबड्डीपटूची क्रिकेट स्टंपने वार करुन हत्या करण्यात आली आहे. विमल राज नाडार (Vimal Raj Nadar) असे या कबड्डीपटूचे नाव आहे. तो अवख्या 26 वर्षांचा आहे. तर मालेश चिताकांडी असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादाचे पर्यावसण मोठ्या हाणामारीत झाल्याने आणि त्यात एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विमल राज नाडार हा चांगला कबड्डी खेळाडू असल्याचे सांगितले जाते. त्याने अल्पावधीतच कबड्डी खेळात चांगले नाव कमावले होते. तो धारावी येथील 90 फिट रोडवर कामराज चाळ येथे राहात होता. झोपेत व्यत्यय आणल्याच्या कारणावरुन वादास सुरुवात झाली. हा वाद विमल राज नाडार याच्या जीवावर बेतला. विमर नाडार हा आपल्या घरी झोपला होता. या वेळी मालेश चिताकांडी आणि त्याचा मित्र त्याच्या घराच्या बाजूला मोठ्याने बोलत होते. मालेश चिताकांडी आणि विमल नाडार हे शेजाशेजारी राहतात. झोपेत व्यत्यय आल्याने विमल नाडारने त्यांना हटकले. त्यातून वादाला सुरुवात झाली. (हेही वाचा, Thane: वयोवृद्ध दाम्पत्याची घरात घुसून हत्या, भिवंडी येथील घटना)
घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, विमल मालेश आणि त्याचा मित्र विमलच्या घराबाहेर बसून मोठमोठ्याने बोलत होते. घरात झोपलेल्या विमलला त्यांच्या बोलण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याने दोघांना जाब विचारला. त्यातून सुरुवातीला किरकोळ बाचाबाची झाली. वाद वाढला. वादाचे पर्यावसण मोठ्या हाणामारीत घडले. मालेश यांचा मित्र आणिन नाडार यांच्या नातेवाईकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थीनंतर वाद थांबला. मालेशही तिथून निघून गेला. मात्र थोड्या वेळात हातात स्टंप घेऊन तो परत आला. त्याने स्टंप त्याच्या डोक्यात घातली. द्यात नाडार जागीच ठार झाला.