Thane: वयोवृद्ध दाम्पत्याची घरात घुसून हत्या, भिवंडी येथील घटना
Image used for represenational purpose (File Photo)

ठाणे येथील भिवंडीत एका वृद्ध दांम्प्त्यांची घरात घुसून निघृणपणे हत्या करण्यात आल्याती घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून बाळू पाटील आणि त्यांची पत्नी सत्यभापा पाटील अशी मृतांची नावे आहेत. या दोघांवर धारधार शस्राने वार करुन आरोपींनी पळ काढला आहे. सदर घटना पेंढरीपाडा येथे घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या वृद्ध दांम्प्त्याची हत्या का करण्यात आली यामागी सत्य अद्याप समोर आलेले नाही. परंतु पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु केला आहे.(Fraud: ऑनलाइन सट्टेबाजीसाठी बँकेतील पैसा वापरल्याप्रकरणी खासगी बँकेच्या उपशाखा व्यवस्थापकाला माटुंगा पोलिसांकडून अटक)

पोलिसांनी मृत दांम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर अज्ञात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीत 24 तासात तीन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. तर बाळू आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. (Club House App Chat Case: क्लबहाऊस अॅप चॅट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून हरियाणातून तीन जणांना अटक)

दरम्यान, भिवंडीत काल संध्याकाळी रोडच्या लगत 40 वर्षीय व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह एका गोणीत भरल्याचे आढळून आले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अरमान असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आता वृद्ध दांम्पत्याची हत्या केल्याने भिवंडी हादरली गेली आहे.