Mumbai Building Collapse Update: डोंगरी भागातील इमारत दुर्घटनेमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
Mumbai Building Collapse | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई एकीकडे कोरोनाशी झुंजत असताना अजूनही शहरात इमारती कोसळल्याचं सत्र सुरूच आहे. दक्षिण मुंबईमध्ये डोंगरी (Dongri) परिसरामध्ये इमारत कोसळल्याची एक घटना समोर आली होती. त्यामध्ये सहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असली तरीही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगार्‍यातून त्यांना काढल्यानंतर नजिक असलेल्या जे जे रूग्णालयामध्ये (J J Hospital)  दाखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. (Palghar Building Collapsed: नालासोपारा मध्ये 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; जीवितहानी नाही).  

आज सकाळी डोंगरी भागातील रत्नदीप बार (Ratnadeep Bar) जवळील एसटी बिल्डिंग चौक (ST Building Chowk) येथील इमारत कोसळून दुर्घटना झाली. यामध्ये 3-7 मजल्यांचा काही भाग कोसळला आहे.

ANI Tweet  

दरम्यान काल रात्री नालासोपारा मध्ये अचोले मध्ये एक रहिवासी इमारत संपूर्ण कोसळली. सुदैवाने त्या इमारतीत कोणीही नव्हते. इमारत ढासळण्यापूर्वीच सारे बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मुंबईमध्ये मात्र मागील काही दिवसांपासून जुन्या, पडक्या इमारती कोसळण्याच्या घटना समोर येण्याचं प्रमाण वाढलं आहे. पालिकेने धोकादायक जाहीर केलेल्या इमारतींना रिकामी करण्यास सध्या कोरोना संकटकाळात अनेक जण तयार नसल्याचं समजतं आहे.