महाराष्ट्रामध्ये इमारत पडझडींचे सत्र अजूनही सुरूच आहे. काल (1 सप्टेंबर) च्या रात्री पालघर (Palghar) जिल्ह्यातील नाला सोपारा (Nala Sopara) परिसरात एक इमारत कोसळली आहे. ही घटना नालासोपार्यात अचोले (Achole) परिसरातील आहे. दरम्यान ही इमारत पूर्णपणे रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. काल दुपारी पालघर मध्ये भूकंपाचा धक्का देखील बसला होता.
मीडीया रिपोर्ट्सनुसार नालासोपारा मध्ये कोसळलेली ही इमारत पालिका प्रशासनाकडून यापूर्वीच धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या 4 मजली इमारतीमधील काही रहिवाशी यापूर्वीच इमारत सोडून इतरत्र राहण्यासाठी गेले होते. मात्र 5 कुटुंब इमारतीमध्ये होती. परंतू माती पडायला सुरूवात होताच रात्री ते सुरक्षित बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. दरम्यान रात्री 12.30 ते 1 च्या सुमारास संपूर्ण 4 मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळल्याचं पाहिलं असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
ANI Tweet
Palghar: A 4-storey building collapsed in Achole area of Nala Sopara late last night; no casualty reported. The building was vacant when it collapsed. #Maharashtra pic.twitter.com/IChn8LNxae
— ANI (@ANI) September 2, 2020
काही दिवसांपूर्वी रायगडच्या महाडमध्ये अशाच प्रकारे एक रहिवासी इमारत कोसळली आहे. त्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर सुमारे 2 दिवस बचावकार्य सुरू होते.