Mumbai Building Collapse: मुंबई मधील डोंगरी येथे इमारतीचा काही भाग कोसळला; 6 जणांची सुखरुप सुटका
Mumbai Building Collapse in Dongri (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मधील डोंगरी (Dongri) भागातील एका इमारतीचा तिसऱ्या ते सातव्या मजल्यावरील काही भाग कोसळून पडला. ही घटना आज सकाळी डोंगरी भागातील रत्नदीप बार (Ratnadeep Bar) जवळील एसटी बिल्डिंग चौक (ST Building Chowk) येथे घडली. घटनेची माहिती मिळता अग्निशमन दल आणि अॅम्ब्युलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजूनपर्यंत 6 लोकांना ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

घटना सकाळी 7.30 वाजता डोंगरी मधील सरदार वल्लभभाई पटेल रोड येथे घडली. रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, एका जुन्या इमारतीच्या 3-7 व्या मजल्यावरील मागचा भाग कोसळून पडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Palghar Building Collapsed: नालासोपारा मध्ये 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; जीवितहानी नाही)

ANI Tweet:

दरम्यान काल रात्री नाला सोपारा येथील अकोले भागात एक 4 मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत कोसळली तेव्हा ती रिकामी होती. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली होती.