मुंबई मध्ये चांदिवली परिसरात शेजार्‍यांच्या जाचाला कंटाळून 44 वर्षीय महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या; एकाला अटक
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये चांदिवली भागात एका 44 वर्षीय महिलेने तिच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारत जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही आत्महत्या असून पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करणार्‍या बाईच्या घरात एक सुसाईड नोट सापडली असून त्यामधे तिने तिचा मुलगा खूप आरडाओरड करत असल्याने तिचे शेजारी देत असल्याने हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 21 जूनची आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, रेश्मा ट्रेन्चिल असे आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या 12 वर्षाच्या मुलासह इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान रेश्माच्या सुसाईड नोट मध्ये तिने लिहलेल्या माहितीनुसार, रेश्माच्या खालच्या मजल्यावर राहणार्‍या अयुब खान व कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली होती. रेश्माचा मुलगा त्रासदायक आहे त्याचा वावर त्रास देणारा असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. खान कुटुंबाने टयुलिपीया गृहनिर्माण संस्थेसह पोलिसांकडे तक्रार केली होती. नक्की वाचा: Dr Rahul Ghule यांचा राजकीय दबावातून आत्महत्येचा प्रयत्न; हॉस्पिटल मध्ये दाखल.

रेश्माने खान कुटुंबाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. सध्या अयुब खान यांना रेश्माच्या आत्माहत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा साकिनाका पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाला आहे.