मुंबई: भरधाव होंडा सिटी कारच्या धडकेत 4 ठार, 4 जखमी;  क्रॉफर्ड मार्केट येथील घटना
Honda City Car Crash At Crawford Market in Mumbai | (Photo Credit: Twitter/ANI)

मुंबई (Mumbai) येथील क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) येथे एमएच शून्य दोन एनए पाच तीन दोन पाच (MH02NA5325)  या क्रमांकाच्या  भरधाव होंडा सिटी (Honda City Car) कारने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रात्री 9 च्या सुमारास घडली. जखमींवर मुंबई येथील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरु आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तात पाच जण जखमी झाल्याचे म्हटले होते. मात्र, सुधारीत माहितीनुसार या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे

घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, भरधाव असलेल्या होंडा सिटी कारने क्रॉफर्ड मार्केट परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या नागरिकांना भीषण धडक दिली. या घटनेत सुरुवातीला कार चालकासह आठजण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, यातील चौघांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, मद्यधुंद पोलिसाने आपल्या गाडीने महिलेला दोन वेळा चिरडले? पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण (Watch Video))

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य केले आहे. तसेच, तपासही सुरु केला आहे. दरम्यान, ही कार कोणाच्या मालिकीची आहे. अपघात कोणत्या कारणामुळे घडला. कार चालकाची स्थिती काय होती. यााबतचा तपशिल पोलीस जमा करत आहेत.