Representational Image | (Photo Credits: PTI)

संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढा देत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलाड (Malad) येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये (Quarantine Centre) एका 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच चारकोप पोलिस पुढील चौकशी करत आहेत. आरोपी हे पीडितेला आय लव्ह यू बोलण्यास जबरदस्ती करत होते, असे तक्रारीत म्हटले गेले आहे. या घटनेमुळे संपूर्ण मालाड परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीच्या वृत्तात घट झाल्याचे बोलले जात होते. मालाड येथील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आरोपींच्याविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला एक आरोपी मुंबई महानगरपालिकेत क्रॉन्ट्रेक्ट लेबर म्हणून काम करत आहे. तर, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस इंस्पेक्टर विठ्ठल शिंदे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- COVID19 Updates: मुंबईत कोरोनाचे थैमान सुरुच; दिवसभरात 1 हजार 128 नव्या रुग्णांची नोंद तर, 20 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांचा विनयभंग करून पळून जाणाऱ्या तरूणाला पोलिसांनी कही तासांपूर्वी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा ऍमेझॉन कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता, असेही माहिती समोर आली आहे.