COVID19 Updates: मुंबईत कोरोनाचे थैमान सुरुच; दिवसभरात 1 हजार 128 नव्या रुग्णांची नोंद तर, 20 जणांचा मृत्यू

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

COVID19 Updates: मुंबईत कोरोनाचे थैमान सुरुच; दिवसभरात 1 हजार 128 नव्या रुग्णांची नोंद तर, 20 जणांचा मृत्यू
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत आज 1 हजार 128 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 67 हजार 635 वर पोहचली आहे. यापैंकी 3 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 हजार 119 जणांना कोरोनावर मात केली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार! आज 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर तर 62 जणांचा मृत्यू

मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2020 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).